single-post

लक्ष्य दिवाळी अनाथ निराधार गरिबांची

2017-10-25 15:41:44

या मथळ्याखाली गेल्या अनेक वर्ष्या पासून हा उपक्रम राबवत आहोत काल हेदुली पाडा वेळुंजे या ठिकाणी आपण बिईंग कॉमन संस्थेकडे जमा केलेले कपडे वाटप केले.. कपडे जमा करण्याच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला
        हेदुळीपाडा निसर्गाच्या कुशीत वसलेला हा पाडा , नाशिकपासून अवघ्या 40 कि मी तर त्रंबक पासून 11 कि मी वर आहे.. जाताना निसर्गरम्य वातावरणातून आपण त्रंबक मार्गे जव्हार रोडला लागतो .. आणि हळू हळू चहू बाजूला डोंगर दऱ्यां हिरवी चादर सर्वदूर पसरलेली आपल्याला पाहायला मिळते.. जस जसे पुढे जाऊ तस तसे डोळ्याचे पारणे फिटावे असे मनमोहक निसर्ग सौन्दर्य अनुभवायलाही मिळतं..मधेच एकटी दुकटी घरे.. चारणारी गुरे ..  बालगोपाळंच्या रस्त्यालगत सुरु असलेल्या बालक्रीडा आणि कुतूहलाने चारचाकी वाहनांकडे बघणारे डोळे.. पुढे घाटात रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नाही अरुंद आणि डागडुजीस आलेल्या रस्त्यावरून आजूबाजूला कुठे पाडा दिसतोय का म्हणून गाडीत बसलेल्या सर्व सदस्यांची घालमेल .. डोंगराच्या कुशीत २०० मी गावाजवळ जाई पर्यंत हा पाडा दिसत नाही .. पाड्याच्या सुरुवातीलाच मुलं जणू स्वागतालाच उभी आहेत अशी उभी होती .. गावातली घरं सगळीच लाकडाने बनलेली .. घराच्या कुडाच्या भिंतींना कोणी मातीचा लेप दिलेला तर कोणी सिमेंटचा तसं सुंदर आणि स्वच्छ परिसर आपल्याला मोहिनी घातल्या शिवाय राहत नाही.. मग सुरु होतो आमचा कार्यक्रम एव्हाना आम्ही गावात आल्याची बातमी सर्व घरात पोहचलेली असते सर्व लोक माता भगिनी आमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आम्हाला आशीर्वाद द्यायला एकत्रित मंदिरासमोर जमा होतात..आणि समोर उभा असतो डिजिटल इंडिया मधला स्मार्ट सिटीतला अति दुर्लक्षित समाज..   इथून पुढे चित्र सुरु होतं ते आता पर्यंत अनूभवलेल्या आल्हाददायक वतावरणापेक्षा वेगळ आणि विदारक..  या गावात लाईट पोल आहेत पण लाईट नाही .. शिकायला दूर शाळेत जावं लागतं पायी ..म्हणून 11 वी ला मुलगी इच्छा असूनहि पाठवू शकत नाही असे सांगणारे पालक.. दिवस भर काम आणि मेहनतीने स्वतःच्या संसाराचा राहट गाणं ओढत चालणारी आणि नाशिक शहरातलं 70 ते 80 च्या दशकात जशी परिस्थिती असेल तशी म्हणजे आपल्यापेक्षा 45 ते 50 वर्ष हे लोक मागे असल्याची अनुभूती मिळाल्या शिवाय राहत नाही.. मुलींना त्यांच्या मासिक गुणधर्मा बद्दल ज्ञान नाही .. शिक्षण आणि बाहेरील जगताशी या लोकांचा तितकासा संबंध येताच नाही .. मी पहिल्या वर्षी गेलो तेंव्हा या ठिकाणी जेमतेम 50 लहान मुलं असतील आज त्याच ठिकाणी मला लहान मुलांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढल्याचं जाणवलं जवळ जवळ 2 ते 5 वर्ष्या पर्यंतची 150 ते 175 मुले माझ्या समोर आजूबाजूला उभी होत गेली..तस तसा माझ्या डोळ्यासमोर त्यांच्या अंधाऱ्या भविष्याच्या चित्रपट उभा राहात गेला.. मन हळहळलं डोळे पाणावले वाटलं रडून घ्यावं खूप पण रडून सांगावं कुणाला .. कोण ऐकणार आहे इथे जातीपातीच्या कुसपटात पुरती बुडालेली माणसं आणि माणुसकी हरवलेले जिवंत हाडा मासाचे सापळे.. बुलेट  ट्रेन च्या दिव्य स्वप्नात आपलच घर आपलीच गाडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी या विश्वात  हरवलेला पंढरपोशी समाज.. कि रोज दारू गुटखा व्यसनांसह हॉटेलिंग आणि पार्ट्या मध्ये रमलेला समाज... कोण ऐकणार .. पण म्हणून रडत बसण्या पेक्षा न थांबता अविरत त्यांच्या साठी काम करण्याची शपतच आमच्या बिईंग कॉमन सदस्यांनी घेतली.. हो जो पर्यंत जिवंत आहोत तो पर्यंत आमच्या ताटातील काही वाटा या पाड्यांसाठी कायम देत राहू  .. यापुढे तुमची इच्छा या हातांना मदतीचा हात देऊन बळ द्यायचं कि नाही.. शेवटी आम्हाला आशीर्वाद तर मिळालेच पण काम करण्याची प्रेरणाही घेऊन गावातून जड अंतकरणाने बाहेर पडलो..
     माझ्यासोबत बिइंग कॉमन चे सर्व सदस्य अतिशय मेहनतीने हा सर्व कार्यक्रम पार पाडत असतात मी काम करतच असतो पण माझ्यासोबत या वेळचे खरे मानकरी डॉ स्नेहा कुलकर्णी आणि अक्की भडके यांनी स्वतः मेहनतही घेतली आणि हा कार्यक्रम शक्य झाला..
       हे  कार्य पार पाडण्यासाठी माझ्या सह डॉ अक्षया पवार , सोनाली पवार , पाटेकर ताई ,निलेश गुंजाळ, आदित्य हंडोरे ,संजय गाडेकर , सागर भाऊ , राकेश हंडोरे , विजय कदम ,अभिषेक कदम आदींसह गावातील सरपंच आणि वरिष्ठ नागरिकही उपस्थित होते..
आपला
विक्रम राजभाऊ कदम
बिईंग कॉमन
For uncommon social work

hello

Authors Contribution to us

we rank user as per their contribution to us

Authors Article Contribution

60% Complete

Total website stuff

60% Complete

author single

LucKy Kimsn

Didn't need no welfare states. Everybody pulled his weight. Gee our old Lasalle ran great. Those were the days. The year is 1987 and NASA launches the last of Americas deep space probes

comments (Only registered users can comment)

 • avatar image 10 Min ago Chris Hemsworth

  Parent Comment

  Reply
  • avatar image 10 Min ago jEsS ben

   baby comment

   Reply
 • avatar image Thu 28th Sep 2017 : 06:28 sandip mishra

  every one has strong feeling to enjoy sexual life now find a prostitutes in russia. we help you to feel your feelings just visit our website prostitutka-xxx.com and find best partner for you. price is not more than your happiness. try once feel to get it again and again.

  Reply

comments

user